बुकमाया परिवारातर्फे आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
Saturday, July 12, 2014
Sunday, May 11, 2014
Happy Mother's Day ! Hirakani chi Gosht (हिरकणीची गोष्ट)
Thursday, May 1, 2014
बुकमाया परिवारातर्फे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो...जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र गीत
बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करी उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
Monday, March 31, 2014
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी घरातील वडिलधारी व्यक्ति गुढी उभारते व इतर सर्वांसह मनोभावे वंदन करून आनंदोत्सव साजरा करते.
गुढीसाठी वेळूची, बांबूची मोठी काठी धुवून स्वच्छ करतात. नंतर तिच्या एका टोकावर रेशमी वस्त्र घालून त्यावर चांदीचे / पितळेचे / तांब्याचे कलशाच्या आकाराचे भांडे पालथे घालतात. त्यावर कडूनिंब पाला , झेंडू, चाफा अशा फुलांच्या माळा व साखरेची माळ त्यावर बांधतात. ही गुढी अंगणात किंवा उंच जागी उभारतात.
शक्य नसल्यास खिडकीत लावतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. हल्ली घरातल्या घरात प्रतीकात्मक म्हणून छोटी गुढी ही उभारतात. एकमेकाला भेटवस्तू म्हणूनही अशी गुढी देतात. गुढीला बांधलेला कडूनिंबाचा पाला व साखरेची माळ जीवनातील कडूगोड प्रसंगांना हसत हसत सामोरे जाण्याची शिकवण देतात. ही शिकवण मनावर बिंबावी म्हणूनच काही भारतीय कुटुंबांत सकाळी कडूनिंबाची काही पाने खाण्याची पद्धत आहे.
गुढीपाडवा हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आहेच. तसेच तो हिंदू पंचागातील साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी पहिला पूर्ण मुहूर्त असल्यामुळे हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
प्राचीन भारतीय पौराणिक परंपरेनुसार ब्रह्मदेवाने केलेल्या जगाच्या निर्मितीनंतर काल गणनेला याच दिवशी सुरुवात झाली. म्हणून गुढीला ब्रम्हध्वजा असेही म्हणतात. श्रीरामाला राज्याभिषेक करण्यात आला तो याच दिवशी. त्या आनंदात अयोध्येत सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याचे उत्तर रामायणात म्हटले आहे.
ऐतिहासिक संदर्भानुसार, इसवी सनानंतर ७८ वर्षांनी,शालिवाहन (सातवाहन) राजाने भारतावर शक टोळ्यांनी केलेले आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले आणि शकांच्या पराभवाचे स्मरण राहावे म्हणून यादिवशी 'शालिवाहन शक' ह्या नवीन सनाचा प्रारंभ केला.
तर असा हा गुढीपाडवा आणि येणारे नविन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुदृढ आरोग्यमय आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा !

Monday, March 24, 2014
श्रमाचे झाले सोने (Shramache Jhaale Sone)
आळशी शिवदास आणि अंबादासला त्यांच्या वडिलांनी शेतात लपवलेला सोन्याच्या मोहोरांचा हंडा कसा सापडतो ते ऐका ह्या कथेतून : श्रमाचे झाले सोने
It's a story of a farmer and his two sons. The farmer takes the help of a friend and teaches his lazy sons the importance of work and labor
(A story shared by my Father-in-law Mr. Sudhir Telang)
Subscribe to:
Posts (Atom)