बुकमाया परिवारातर्फे मराठी वर्षप्रतिपदेच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
ह्या नववर्षारंभानिमित्ताने सादर करत आहोत कविता "तेजोमय गुढीपाडवा"
नव्या पहाटे फाकली नवी उषःप्रभा,
तेजाळत दशदिशा भूवरी उजळीत नभा ||
नववर्षाचे स्वागत करुनि थोरांसी वंदन,
बांधूनी मांगल्याचे दारी तोरण ||
विवेकाची गुढी चढविली अंबरी,
सजविली पताका सदाचाराची घरोघरी ||
नवोदय केला साजरा नववर्षाचा,
सण तेजोमय गुढीपाडवा हर्षोल्हासाचा ||
नव्या पर्वाची आस जनी उत्साह नवा,
गाभारी मनाच्या तम सरो, प्रकाश नवा ||
रुजवूनी प्रेम स्नेह वाढवू नात्यात गोडवा,
गोड ह्या सणाचा आनंद सदा लाभावा ||
जोडोनिया कर दोन्ही ईशचरणी,
तेज सद्भक्तिचे उफाळो केली आळवणी ||
-सौ. मेधा श्रीश कामत
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमेधा,
ReplyDeleteअर्थगर्भ प्रतिभेचा आविष्कार आहे तुझ्या काव्यात.
" विवेकाची गुढी चढविली अंबरी, " हा संकेत तुझ्या प्रतिभेला एका नव उत्थानाच्या दिशेने नेतो. .
सरस्वतीचा वरदहस्त असो. .
शुभेच्छा 💐