नमस्कार रसिकहो ,
कथा, गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही? आपल्या बालपणी आजी-आजोबांकडून, आई-बाबांकडून गोष्टी ऐकण्यात किती गंमत वाटत असे, आठवतंय ना!
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत मात्र आता आपल्याला पुस्तक वाचायलाही वेळ मिळत नाही तर घरातील लहान मुलांना गोष्ट सांगायला वेळ काढावा कसा? हा प्रश्न आमच्या अनेक मित्र मैत्रिणिंना पडला आहे.
परवाच एका मित्राच्या नविन घरी एक संपूर्ण भिंत व्यापून राहिलेले भले मोठे पुस्तकांचे कपाट दिसले.
आनंद झाला. त्याला म्हटले, "वा! एवढी सगळी पुस्तकं तू वाचली आहेस तर मग तू खराच नशीबवान आहेस मित्रा" . तर तो ओशाळला आणि म्हणाला, ''छे, छे! मी कसला नशीबवान? मी ही सारी पुस्तकं वाचता यावीत म्हणून खरेदी केलीत हे खरं पण ह्यांपैकी एकदेखील पूर्ण वाचायला मला वेळ मिळालेला नाही याचंच वाईट वाटतंय. "
हे ऐकून आम्हालाही वाईट वाटलं. पुस्तकं म्हणजे अनुभवांचं, विचारांचं धन. परंतु धन केवळ पेटीत भरुन ठेवलं तर त्याची किंमत वाढणार कशी? त्यापेक्षा ते धन चांगल्या कामांत, प्रकल्पांत गुंतविले तर बघता बघता त्याची किंमत देखील दाम-दुप्पट होते. यासाठी आपण काय बरं करु शकतो असा विचार करता करता एक युक्ति सुचली. ती तुमच्याशी शेअर करतेय.
काल परवा पर्यंत अशक्य वाटत असलेली अनेक कामे आज इंटरनेटच्या मदतीने सहजसाध्य झाली आहेत. हजारों मैलांवर वसलेल्या शहरांतील लोकांना इंटरनेटने आता एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवलंय. घरी बसून ऑन-लाईन शॉपिंग करणं आता आपल्याला शक्य आहे. तेव्हा इंटरनेटच्या ह्या जादुच्या कांडीचा उपयोग करुन आपण आपल्या मित्र मैत्रिणींना पुस्तके वाचून दाखवू शकतो. लहान मुलांना गोष्टी ऐकायला तर फार आवडतं. आपण ह्या छोट्या मित्र मैत्रिणींना इंटरनेट द्वारे गोष्टी सांगितल्या तर… केवळ भारतीयच नव्हे तर देशोदेशीच्या विविध संस्कृतीतील गोष्टी ऐकवत त्यांना भविष्यात ग्लोबल सिटीझन होण्यास मदत होईल. शिवाय औपचारिक शिक्षणात देखील इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मग ठरवलं की मनोरंजनासह अनौपचारिकरित्या शिक्षण संस्कार देणारी पुस्तके व गोष्टी आपल्यासारख्या रसिकांसाठी इंटरनेट द्वारे ऑडियो माध्यमातून सादर करायची आणि म्हणून आपल्या समोर मांडत आहे ही 'बुकमाया '.
'बुकमाया' म्हणजे पुस्तकांत दडलेली धन संपत्ती आपल्या रसिकांसाठी श्रवणीय स्वरूपात सादर करीत आहोत . आणि आज श्रीगणेशा करताना शुभारंभाची कथा 'अग्रपूजा' .MP3 स्वरुपात आपल्यासाठी पोस्ट करताना खूप आनंद होत आहे. लवकरच अशा आणखी अनेक मजेदार कथा आणि पुस्तके आपल्या भेटीला येत आहेत. कारण आमचं ब्रीदवाक्य आहे : आम्ही वाचु आनंदे तुमच्यासाठी !
तर ऐकत रहा… 'बुकमाया '!!

No comments:
Post a Comment