Thursday, December 31, 2015

सुस्वागतम २०१६!!

सुस्वागतम २०१६!!
बुकमाया परिवारातर्फे सर्व रसिकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!


१ जानेवारी ते १५ जानेवारी आपण साजरा करत आहोत ‘मराठी पंधरावडा’.
त्या निमित्ताने या पंधरावड्यात दररोज आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत ‘मराठी मेवा’.
या तर, सामील होऊया  ह्या माय मराठीच्या सोहळ्यात आणि लुटुया आनंद आणि मराठी मेवा   

Thursday, October 22, 2015

बुकमाया परिवारातर्फे दसरा - विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

बुकमाया परिवारातर्फे दसरा - विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !! 

Sunday, August 9, 2015

प्रिय छोट्या मित्र मैत्रिणींनो,


बरं का, मित्र मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी रचलेल्या ह्या १४ ओळींच्या संदेशपर नवकवितेत आणखी एक छोटासा पण महत्वाचा संदेश दडलाय. त्याच वाक्यावर आधारित आहे आपल्या बुकमायाची पुढील गोष्ट. चला तर  ते संदेशपर वाक्य अचूक शोधून आम्हाला लगेच कळवा. पाहुया तुम्हाला ओळखता येतंय का ते....



प्रिय छोट्या मित्र मैत्रिणींनो,

हृद्य आठवणी जीवनातल्या, आजी आजोबांकडून, आई बाबांकडून ऐकलेल्या शिकवतात खूप काही
दररोज नको पण दसरा दिवाळीला, विशेष सणा- वाराच्या दिवशी वंदन करा त्यांनाही
या वर्षीचा अभ्यास गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहाने करण्याचे ठरवा
तसेच फक्त अभ्यास न करता इतर कला, खेळांतही भाग तुम्ही घ्यावा
आरोग्य नेहमीच जपा तो तर आहे आपला मोठा दागिना
पुष्कळ छान छान गोष्टी आहेत जीवनात त्याही शिकून घ्याना
ल्यायला कपडे आणि खायला अन्न फक्त इतकेच जीवनाचे ध्येय नसावे
देशासाठी काय करावे तर प्रत्येकाने स्वतःला सुविद्य सदाचारी बनवावे
शाळेत दिलेला अभ्यास करून रोज चांगली, बोधक पुस्तके वाचावीत, ‘बुकमाया’ वरील गोष्टी ऐकाव्यात
भिस्त तुमच्या आई-वडिलांची, देशाची तुमच्यावरच आहे
मानाने जगण्यासाठी इतरांना मानाने जगविणे महत्वाचे आहे.
नका जाऊ मोबाईलच्या, खेळांच्या आहारी
ठेवाल मन नेहमी प्रसन्न तर घेता येईल यशोभरारी
वागणूक आपली स्वच्छ आणि सदाचाराची असेल तर आत्मविश्वास नेहमीच आपल्याला यशोशिखरावर नेतो.

रचना: सौ. मेधा श्रीश कामत

Tuesday, March 10, 2015

नमस्ते कुसुमाग्रजा!


कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

नमस्ते कुसुमाग्रजा!


नमस्ते कुसुमाग्रजा! सय ठेवूनी गेलात
गोड हिरव्या मखमली नि रेशीम बंधनात


किमया तुमच्या जादूभऱ्या शब्दांतुनी
जगता सजविले कुसुमे तुम्ही पसरुनी


हळूवार प्रेमभावना त्यातुनी स्रवती
आजही चिरतरुण मने हृदयस्पर्श अनुभवती


भवतीच्या ऋतुंची किमया रुजविली मनोमनी
त्या सामर्थ्ये आजही फुले गंधित फुलती जीवनी


निष्पर्ण रानी फुलविली कधी प्रेममाया
कधी जागविली वीरता ललकारुनी धैर्या


ऋषीतुल्य तुम्ही, गुरुस्थानी आम्हा
वारसा दिधला वंद्य तुम्ही आम्हा


द्या गोडवा वाणीचा नि लेखणी तेजाची
जन्मलो या भारती, सेवा करु मराठी मायबोलीची


द्या आशीर्वाद, कवीश्वर तुम्ही प्रतिभावंत
पूज्य तुम्ही, करतो मानाचा मुजरा आम्ही भाग्यवंत
  


- सौ. मेधा श्रीश कामत

Sunday, March 8, 2015

अनंतकाळची माता

(महिला दिनानिमित्त बुकमाया सादर करीत आहे ‘संस्कारदीप दिवाळी २०१४’ अंकामध्ये प्रसिद्ध झालेली ही कविता )




अनंतकाळची माता


हे शक्ति, हे नारी वंद्य तू विरांगना
किती म्हटले जरी तू ना अबला ललना


असे सत्य ऐकण्या कठिण, काही पुरुषांना
अवतीभवती, तुमच्या घरी पहाता त्या वावरताना


पुरुषाला जन्मही स्त्रीच देते
तुमची मर्दुमकी येथे फोल ठरते


कळा यातना भोग का तिला देता
ती नीच आम्हीच मोठे म्हणून मिरविता


पुरुषांनो, एवढे असाल जर स्वयंभू-बलशाली
तुम्हीच वाढवा तर पोटी तुमच्या वंशावळी


छळून पिडून घेता तिचा नाहक बळी
हीच म्हणे खूण पुरुषार्थाची आगळी वेगळी


अंश प्रसावूनी तू मानव घडविणे गोष्ट नाही खरी
नको बनूस दानव, जगती माननीय आहे नारी


खजील होई विधाता पाहूनी तुमचा ताठा
ज्याने दिला बहुमान स्त्रीला बनवूनी
                           अनंतकाळची माता


- सौ. मेधा श्रीश कामत

Monday, January 26, 2015

बुकमाया परिवारातर्फे सर्वाना भारतीय गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद !!!

बुकमाया परिवारातर्फे सर्वाना भारतीय गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद !!!
भारतमाता की जय!!

Sunday, January 25, 2015

बुकमाया परिवाराकडून रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!!


बुकमाया परिवाराकडून रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
रचना : सौ. मेधा कामत
वाचन: सौ. यामिनी तेलंग




Wednesday, January 14, 2015

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला (भाग २)

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !!

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !! (भाग १)

बुकमाया परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!