बरं का, मित्र मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी रचलेल्या ह्या १४ ओळींच्या संदेशपर नवकवितेत आणखी एक छोटासा पण महत्वाचा संदेश दडलाय. त्याच वाक्यावर आधारित आहे आपल्या बुकमायाची पुढील गोष्ट. चला तर ते संदेशपर वाक्य अचूक शोधून आम्हाला लगेच कळवा. पाहुया तुम्हाला ओळखता येतंय का ते....
प्रिय छोट्या मित्र मैत्रिणींनो,
हृद्य आठवणी जीवनातल्या, आजी आजोबांकडून, आई बाबांकडून ऐकलेल्या शिकवतात खूप काही
दररोज नको पण दसरा दिवाळीला, विशेष सणा- वाराच्या दिवशी वंदन करा त्यांनाही
या वर्षीचा अभ्यास गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहाने करण्याचे ठरवा
तसेच फक्त अभ्यास न करता इतर कला, खेळांतही भाग तुम्ही घ्यावा
आरोग्य नेहमीच जपा तो तर आहे आपला मोठा दागिना
पुष्कळ छान छान गोष्टी आहेत जीवनात त्याही शिकून घ्याना
ल्यायला कपडे आणि खायला अन्न फक्त इतकेच जीवनाचे ध्येय नसावे
देशासाठी काय करावे तर प्रत्येकाने स्वतःला सुविद्य सदाचारी बनवावे
शाळेत दिलेला अभ्यास करून रोज चांगली, बोधक पुस्तके वाचावीत, ‘बुकमाया’ वरील गोष्टी ऐकाव्यात
भिस्त तुमच्या आई-वडिलांची, देशाची तुमच्यावरच आहे
मानाने जगण्यासाठी इतरांना मानाने जगविणे महत्वाचे आहे.
नका जाऊ मोबाईलच्या, खेळांच्या आहारी
ठेवाल मन नेहमी प्रसन्न तर घेता येईल यशोभरारी
वागणूक आपली स्वच्छ आणि सदाचाराची असेल तर आत्मविश्वास नेहमीच आपल्याला यशोशिखरावर नेतो.
रचना: सौ. मेधा श्रीश कामत
No comments:
Post a Comment