१८५७ सालच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समराच्या पर्वाचे स्मरण करताना त्या समरातील अग्रणी योद्धा असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचे स्मरण झाले. कै. वि. वा. शिरवाडकरांनी राणीच्या युद्धकालीन चरित्रावर लिहिलेल्या ‘वीज म्हणाली धरतीला’ ह्या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची ऐतिहासिक घोषणा आज सादर करते.
Tuesday, May 10, 2016
Friday, January 15, 2016
मराठी मेवा - दिवस पंधरावा - क्रमांक १५
मराठी मेवा - दिवस पंधरावा - क्रमांक १५
कविता : मी सूर्याची किरणशलाका
रचना व काव्यवाचन : प्रीति कामत तेलंग Thursday, January 14, 2016
मराठी मेवा - दिवस चौदावा - क्रमांक १४
मराठी मेवा - दिवस चौदावा - क्रमांक १४
कथा: गोपाल भारची करामत (बंगाली लोककथेचा मराठीत स्वैर अनुवाद)
अनुवाद आणि कथाकथन: प्रीति कामत तेलंग Wednesday, January 13, 2016
मराठी मेवा - दिवस तेरावा - क्रमांक १३
मराठी मेवा - दिवस तेरावा - क्रमांक १३
कविता : नमस्ते कुसुमाग्रजा
कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत
काव्यवाचन : सौ. यामिनी तेलंग
कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
नमस्ते कुसुमाग्रजा!
नमस्ते कुसुमाग्रजा! सय ठेवूनी गेलात
गोड हिरव्या मखमली नि रेशीम बंधनात
किमया तुमच्या जादूभऱ्या शब्दांतुनी
जगता सजविले कुसुमे तुम्ही पसरुनी
हळूवार प्रेमभावना त्यातुनी स्रवती
आजही चिरतरुण मने हृदयस्पर्श अनुभवती
भवतीच्या ऋतुंची किमया रुजविली मनोमनी
त्या सामर्थ्ये आजही फुले गंधित फुलती जीवनी
निष्पर्ण रानी फुलविली कधी प्रेममाया
कधी जागविली वीरता ललकारुनी धैर्या
ऋषीतुल्य तुम्ही, गुरुस्थानी आम्हा
वारसा दिधला वंद्य तुम्ही आम्हा
द्या गोडवा वाणीचा नि लेखणी तेजाची
जन्मलो या भारती, सेवा करु मराठी मायबोलीची
द्या आशीर्वाद, कवीश्वर तुम्ही प्रतिभावंत
पूज्य तुम्ही, करतो मानाचा मुजरा आम्ही भाग्यवंत
सौ. मेधा श्रीश कामत
Tuesday, January 12, 2016
मराठी मेवा - दिवस बारावा -क्रमांक १२
आज स्वामी विवेकानंदांची जयंती अर्थात आपला राष्ट्रीय युवा दिन आपण आज साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने भावी युवा पिढीला अत्यंत अनमोल शिकवण देणारी स्वामी विवेकानंदांचीच एक गोष्ट आज सादर केली आहे. जरूर ऐका
मराठी मेवा - दिवस बारावा -क्रमांक १२
थोर माणसांचे गुण लहानपणीच त्यांच्या वागण्यात दिसतात त्यावरूनच ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. गरीब मित्राला मदतीचा हात पुढे करण्याच्या छोट्या नरेंद्राच्या साध्या कृतीतून त्याची कनवाळू वृत्ती पाहून त्याची आई काय करते ते ऐका ह्या कथेतून. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला जरुर सांगा.मराठी मेवा - दिवस बारावा -क्रमांक १२
कथा : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
कथाकथन : प्रीति कामत तेलंग Monday, January 11, 2016
मराठी मेवा - दिवस अकरावा - क्रमांक ११
मराठी मेवा - दिवस अकरावा - क्रमांक ११
कविता - माझा गाव
कवी : कै. बा. भ. बोरकर
काव्यवाचन : प्रीति कामत तेलंग
Sunday, January 10, 2016
मराठी मेवा - दिवस दहावा -क्रमांक १०
मराठी मेवा - दिवस दहावा -क्रमांक १०
ललित : सूर्याचे दूरदर्शन
लेखन आणि वाचन : प्रीति कामत तेलंग Saturday, January 9, 2016
मराठी मेवा - दिवस नववा -क्रमांक ९
मराठी मेवा - दिवस नववा -क्रमांक ९
आज ऐकुया काव्यवाचन …. आमची आई स्वतः सिद्धहस्त शीघ्र कवयित्री आहे. बालकविता, प्रेमकविता यांसोबतच तिने रचलेल्या काही विचारनिष्ठ मुक्तकविता देखील वेळोवेळी विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असतात. तिच्या अशाच मुक्तकवितांपैकी ‘अनंतकाळची माता’ ही एक कविता २०१४ च्या संस्कारदीप दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. ती फार गाजली देखील. आज तीच कविता तुम्हाला ऐकवताना पुनर्भेटीचा आनंद होतोय.
कविता : अनंतकाळची माता
कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत
काव्यवाचन: सौ. प्रीति कामत तेलंग
अनंतकाळची माता
हे शक्ति, हे नारी वंद्य तू विरांगना
किती म्हटले जरी तू ना अबला ललना
असे सत्य ऐकण्या कठिण, काही पुरुषांना
अवतीभवती, तुमच्या घरी पहाता त्या वावरताना
पुरुषाला जन्मही स्त्रीच देते
तुमची मर्दुमकी येथे फोल ठरते
कळा यातना भोग का तिला देता
ती नीच आम्हीच मोठे म्हणून मिरविता
पुरुषांनो, एवढे असाल जर स्वयंभू-बलशाली
तुम्हीच वाढवा तर पोटी तुमच्या वंशावळी
छळून पिडून घेता तिचा नाहक बळी
हीच म्हणे खूण पुरुषार्थाची आगळी वेगळी
अंश प्रसावूनी तू मानव घडविणे गोष्ट नाही खरी
नको बनूस दानव, जगती माननीय आहे नारी
खजील होई विधाता पाहूनी तुमचा ताठा
ज्याने दिला बहुमान स्त्रीला बनवूनी
अनंतकाळची माता
- सौ. मेधा श्रीश कामत
Friday, January 8, 2016
मराठी मेवा - दिवस आठवा -क्रमांक ८
मराठी मेवा - दिवस आठवा -क्रमांक ८
बालकथा: पराक्रमी गंपू ( लोकसत्ता - रविवार वृत्तमानस मधून साभार)
लेखक : विनायक कुळकर्णी
कथाकथन: प्रीति कामत तेलंग
Thursday, January 7, 2016
मराठी मेवा - दिवस सातवा - क्रमांक ७
आजचा मराठी मेवा - दिवस सातवा - क्रमांक ७
जैसी हरळांमाजि रत्नकिळा ।
कि रत्नांमाजि हिरा निळा ।
तैसी भासांमाजि चोखळा । भासा मराठी ॥
जैसी पुस्पांमाजि पुस्पमोगरी ।
कि परिमळांमाजि कस्तुरी ।
तैसी भासांमाजि साजिरी । मराठिया ॥
पखयांमधे मयोरू । वृखियांमधे कल्पतरू ।
भासांमधे मानु थोरू । मराठियेसि ॥
तारांमधे बारा रासी । सप्त वारांमधे रवी-ससी ।
या दिपिचेआं भासांमधे तैसी । बोली मराठिया ॥
- फादर स्टीफन्स
( ख्रिस्तपुराण )
Wednesday, January 6, 2016
मराठी मेवा - दिवस सहावा - क्रमांक ६ एकतेचे बळ
मराठी मेवा - दिवस सहावा - क्रमांक ६ एकतेचे बळ
बुकमायाच्या प्रिय बालमित्रांची ही आवडती कथा कथन केली आहे खास तुमच्यासाठी लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा!!
कथाकथन : यामिनी तेलंग
चित्रफित संकल्पना: डॉ. अजिंक्य कामत
छोटे छोटे पक्षीदेखील एकत्र मिळून मोठी कामगिरी कशी करतात ते ऐका ह्या कथेतून : एकतेचे बळ
Tuesday, January 5, 2016
मराठी मेवा - दिवस पाचवा - क्रमांक ५
मराठी मेवा - दिवस पाचवा - क्रमांक ५
उतारा वाचन - सौ. श्यामल टिपरे यांची डायरी
वाचक : प्रीति कामत तेलंग
पुस्तक : अनुदिनी
लेखक : दिलीप प्रभावळकर
Monday, January 4, 2016
मराठी मेवा - दिवस चौथा - क्रमांक ४
मराठी मेवा - दिवस चौथा - क्रमांक ४
कविता गायन : माझी आवडती कविता
कविता: पिंपळपान
कवी : कै मंगेश पाडगावकर Sunday, January 3, 2016
मराठी मेवा - दिवस तिसरा - क्रमांक ३
मराठी मेवा - दिवस तिसरा - क्रमांक ३
पुस्तक: आमच्या आयुष्यातील काही आठवणी
लेखिका : रमाबाई रानडे
उतारावाचन - प्रीति कामत तेलंग
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
त्यांच्याप्रमाणेच जानेवारी महिन्यात जन्मलेल्या, स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यासाठी आयुष्य वेचलेल्या, त्यांच्या समाजकार्याचा जणू वारसाच पुढे ज्यांनी चालवला त्या रमाबाई रानडेंच्या आत्मकथनातील हा उतारा आज सादर करत आहोत खास तुमच्यासाठी.
लहानग्या रमेला वाचता येऊ लागल्यावर तिला बालवयातील एका गुपिताचा कसा उलगडा झाला, त्यामुळे तिला झालेला आनंदच पुढे आणखी शिकण्यासाठी तिला प्रेरणा देऊन गेला. Saturday, January 2, 2016
मराठी मेवा - दिवस दुसरा - क्रमांक २
मराठी मेवा - दिवस दुसरा - क्रमांक २
उतारावाचन
ललितलेख : गवई
पुस्तक: सुदाम्याचे पोहे
लेखक : कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
मराठी ललित लेखनाचे उद्गाते म्हणून ओळखले जाणारे विख्यात लेखक कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या खुसखुशीत शैलीचा आस्वाद घेऊया ह्या मेव्यातून.
Friday, January 1, 2016
मराठी मेवा - दिवस पहिला - क्रमांक १ (ॐ नमोजी आद्या)
मराठी मेवा - दिवस पहिला - क्रमांक १
ॐ नमोजी आद्या - आद्यकवी संत श्री ज्ञानेश्वर यांची रचना
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
ह्मणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥
आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥
Subscribe to:
Comments (Atom)