आज स्वामी विवेकानंदांची जयंती अर्थात आपला राष्ट्रीय युवा दिन आपण आज साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने भावी युवा पिढीला अत्यंत अनमोल शिकवण देणारी स्वामी विवेकानंदांचीच एक गोष्ट आज सादर केली आहे. जरूर ऐका
मराठी मेवा - दिवस बारावा -क्रमांक १२
कथा : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
कथाकथन : प्रीति कामत तेलंग
थोर माणसांचे गुण लहानपणीच त्यांच्या वागण्यात दिसतात त्यावरूनच ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. गरीब मित्राला मदतीचा हात पुढे करण्याच्या छोट्या नरेंद्राच्या साध्या कृतीतून त्याची कनवाळू वृत्ती पाहून त्याची आई काय करते ते ऐका ह्या कथेतून. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला जरुर सांगा.
आज ऐकुया काव्यवाचन …. आमची आई स्वतः सिद्धहस्त शीघ्र कवयित्री आहे. बालकविता, प्रेमकविता यांसोबतच तिने रचलेल्या काही विचारनिष्ठ मुक्तकविता देखील वेळोवेळी विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असतात. तिच्या अशाच मुक्तकवितांपैकी ‘अनंतकाळची माता’ ही एक कविता २०१४ च्या संस्कारदीप दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. ती फार गाजली देखील. आज तीच कविता तुम्हाला ऐकवताना पुनर्भेटीचा आनंद होतोय.
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
त्यांच्याप्रमाणेच जानेवारी महिन्यात जन्मलेल्या, स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यासाठी आयुष्य वेचलेल्या, त्यांच्या समाजकार्याचा जणू वारसाच पुढे ज्यांनी चालवला त्या रमाबाई रानडेंच्या आत्मकथनातील हा उतारा आज सादर करत आहोत खास तुमच्यासाठी.
लहानग्या रमेला वाचता येऊ लागल्यावर तिला बालवयातील एका गुपिताचा कसा उलगडा झाला, त्यामुळे तिला झालेला आनंदच पुढे आणखी शिकण्यासाठी तिला प्रेरणा देऊन गेला.