Friday, January 1, 2016

मराठी मेवा - दिवस पहिला - क्रमांक १ (ॐ नमोजी आद्या)




मराठी मेवा - दिवस पहिला - क्रमांक १


ॐ नमोजी आद्या - आद्यकवी संत श्री ज्ञानेश्वर यांची रचना


ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥


देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
ह्मणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥


अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥


हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥


आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥

No comments:

Post a Comment