Wednesday, December 18, 2013

बिरबलाच्या चातुर्य कथा - कथा १ : खणखणीत मोबदला (Birbal story - 1)


लोभी भिकाजी शेठला बिरबलाने त्याच्या मिठाईच्या सुगंधाचा मोबदला दिला आणि 'जशास तसे' ही
म्हण सार्थ केली. कशी ते ऐका या कथेतून :  खणखणीत मोबदला

Thursday, November 28, 2013

जॉर्ज वॉशिंग्टनची एक गोष्ट (A story of George Washington)


अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आपला सारा मोठेपणा बाजूला ठेवून साध्या शिपायांच्या मदतीला कसे धावून गेले ते ऐका ह्या कथेतून : जॉर्ज वॉशिंग्टनची एक गोष्ट

                    

Tuesday, November 19, 2013

गोपाल भारची करामत (Gopal Bhaarchi Karamat)


बंगाली लोकसाहित्यातील अजरामर चतुर पात्र 'गोपाल भार' आणि त्याचे भांडखोर शेजारी यांची ही मजेदार गोष्ट ऐका : गोपाल भारची करामत

                    

Thursday, November 14, 2013

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! (Happy Childrens' Day ! )

सर्व बालमित्रांना बुकमाया परिवाराकडून बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, November 10, 2013

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात: गोष्ट स्वामी विवेकानंदांची (Mulache Paay Palanyaat Disatat: A Story of Swami Vivekananda)


थोर माणसांचे गुण लहानपणीच त्यांच्या वागण्यात दिसतात त्यावरूनच ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. गरीब मित्राला मदतीचा हात पुढे करण्याच्या छोट्या नरेंद्राच्या साध्या कृतीतून त्याची कनवाळू वृत्ती पाहून त्याची आई काय करते ते ऐका ह्या कथेतून. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला जरुर सांगा.

                    

Tuesday, November 5, 2013

कबूतर आणि मुंगी (Kabutar ani Mungi)


'इवले इवले जीव ही येती मोठ्या मोठ्या कामाला' हे सांगणारी ईसापनीति मधील छोटीशी गोष्ट ऐका : कबूतर आणि मुंगी

                    

शुभ दीपावली ! (Diwali Wishes!)



शुभ दीपावली !

बुकमाया परिवारातर्फे सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !


आज ख़ास भाऊबीजेच्या निमित्ताने आमच्या आईने रचलेली एक छानशी कविता तुमच्या साठी सादर करत आहोत .

आजच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाला भाऊबीजेनिमित्त घरी येण्याचे सप्रेम निमंत्रण देते. या कवितेतून बहीण आज एका थोर भावाला बोलावणे धाडत आहे . आता ऐका ही कविता … त्वमेव बंधू सखा त्वमेव

                    

त्वमेव बंधू सखा त्वमेव 


आग्रहाचे करीते मी निमंत्रण 
यावे हो भाऊबीज कारण 
आला आला हो दिवाळसण 
यावे ज्ञाना भाऊ सवे घेऊनी बंधुजन ।।

भक्तिभावे धाडीते मी सांगावा 
यावे हो तुम्ही माझिया गावा 
संगे आणावी माझी मुक्ताई 
महान देवी, ती प्रतीरूप आई ।।

तुम्ही माझेही थोर बंधुभगिनी 
भेट व्हावी या हो तुम्ही झणी 
ओवाळीन मी निरंजनी लोचन 
दर्शन तुमचे जणु अमृत प्राशन ।।

मना माझ्या मिळेल अपूर्व समाधान 
भूक शमेल तेव्हाच, घडता तुमचे दर्शन 
तृषार्त दर्शनार्थी अधीर माझे नेत्र 
भक्तीभावाच्या फुलांत गुंफीते गात्रन् गात्र ।।

तीर्थ प्राशुनी तुमच्या पदकमलांचे
होईल सार्थक माझ्या साता जन्मांचे 
द्या भेटीचे सुख पाहते वाटुली तुमची 
निवेल तहानभूक तळमळल्या जीवाची ।। 

‘पसायदान’ जे तुम्ही मागितले 
शतकांमागे विश्वात्मके देवाले 
मागीन फिरुनी, करीन आर्जवे 
मिळेल का ते आज, मागता तुम्हां सवे ।।


- सौ. मेधा श्रीश कामत 
भाऊबीज २०१३ 

Tuesday, October 22, 2013

चंद्राचे गर्वहरण (Chandrache Garvaharan)



आज अंगारकी संकष्टी चतुर्थी! त्या निमित्ताने ऐका ही गणपती बाप्पाची आणखी एक गोष्ट : स्वत:च्या चंदेरी रुपाचा गर्व झालेला चंद्र बाप्पाची फजिती पाहून हसला आणि मग त्याची त्याला कशी शिक्षा मिळाली ते ऐका या गोष्टीतून : चंद्राचे गर्वहरण


                    

Friday, October 18, 2013

बंधुप्रेम (Bandhuprem)


ऐका बंडू आणि चंदूच्या बंधुप्रेमाची गोष्ट: 'बंधुप्रेम'.

                    

Sunday, October 13, 2013

​माकडाचे काळीज (Makadache Kalij)


जग्गु माकड आपल्यातल्या चेरी उदारपणे मग्गु मगरीला देते आणि … पुढे काय होते ते ऐका या गोष्टीतून.

                    

कालिमातेचे वरदान (Kalimateche Varadaan)


एक अडाणी गुराखी काली मातेच्या कृपेने महाकवि कालिदास म्हणून कसा अजरामर झाला ते ऐका संस्कृत साहित्यातील या एका सुप्रसिद्ध कथेतून : कालिमातेचे वरदान

                    

दसऱ्याच्या शुभेच्छा (Dussera Wishes)

बुकमाया परिवारातर्फे सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Thursday, October 10, 2013

लांडगा आला रे आला ! (Landaga Ala Re Ala!)


लांडगा आल्याची खोटी बतावणी करणारा भीरु गुराखी आणि खरा लांडगा कुरणात आल्यावर काय होते ते ऐका ह्या लोककथेत: लांडगा आला रे आला !

                    

Tuesday, October 8, 2013

चोरावर मोर (Choravar Mor)


आळशी दुलाजीने केलेली चोरी त्याच्यावरच कशी उलटते ते ऐका ह्या मजेदार गोष्टीतून: चोरावर मोर

                    

Sunday, October 6, 2013

आरुणीची कथा (Aarunichi Katha)


नि:सीम गुरुभक्तिचा आदर्श जगासमोर ठेवणारा धाडसी आरुणी आणि त्याच्या निश्चयाची कथा ऐका: आरुणीची कथा

                    

अग्रपूजा (Agrapujaa)


अग्रपूजेच्या मानासाठी देवलोकात झालेल्या शर्यतीत आपले लाडके लंबोदर गणपतीबाप्पा कसे विजयी झाले त्याची ऐका ही छोटीशी कथा: अग्रपूजा

                    

श्रीगणेशा - आम्ही वाचु आनंदे तुमच्यासाठी ! ( Happy to read for you!)

नमस्कार रसिकहो ,

कथा, गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही? आपल्या बालपणी आजी-आजोबांकडून, आई-बाबांकडून गोष्टी ऐकण्यात किती गंमत वाटत असे, आठवतंय ना!

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत मात्र आता आपल्याला पुस्तक वाचायलाही वेळ मिळत नाही तर घरातील लहान मुलांना गोष्ट सांगायला वेळ काढावा कसा? हा प्रश्न आमच्या अनेक मित्र मैत्रिणिंना पडला आहे.

परवाच एका मित्राच्या नविन घरी एक संपूर्ण भिंत व्यापून राहिलेले  भले  मोठे पुस्तकांचे कपाट दिसले.
आनंद झाला. त्याला म्हटले, "वा! एवढी सगळी पुस्तकं तू वाचली आहेस तर मग तू खराच नशीबवान आहेस मित्रा" . तर तो ओशाळला आणि म्हणाला, ''छे, छे! मी कसला नशीबवान? मी ही सारी पुस्तकं वाचता यावीत म्हणून खरेदी केलीत हे खरं पण ह्यांपैकी एकदेखील पूर्ण वाचायला मला वेळ मिळालेला नाही याचंच वाईट वाटतंय. "

हे ऐकून आम्हालाही वाईट वाटलं. पुस्तकं म्हणजे अनुभवांचं, विचारांचं धन. परंतु धन केवळ पेटीत भरुन ठेवलं तर त्याची किंमत वाढणार कशी? त्यापेक्षा ते धन  चांगल्या कामांत, प्रकल्पांत गुंतविले तर बघता बघता  त्याची किंमत देखील दाम-दुप्पट होते. यासाठी आपण काय बरं करु शकतो असा विचार करता करता एक युक्ति सुचली. ती तुमच्याशी शेअर करतेय.

काल परवा पर्यंत अशक्य वाटत असलेली अनेक कामे आज इंटरनेटच्या मदतीने सहजसाध्य झाली आहेत. हजारों मैलांवर वसलेल्या शहरांतील लोकांना इंटरनेटने आता एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवलंय. घरी बसून ऑन-लाईन शॉपिंग करणं आता आपल्याला शक्य आहे. तेव्हा इंटरनेटच्या ह्या जादुच्या कांडीचा उपयोग करुन आपण आपल्या मित्र मैत्रिणींना पुस्तके वाचून दाखवू शकतो. लहान मुलांना गोष्टी ऐकायला तर फार आवडतं. आपण ह्या छोट्या मित्र मैत्रिणींना इंटरनेट द्वारे गोष्टी सांगितल्या तर… केवळ भारतीयच नव्हे तर देशोदेशीच्या विविध संस्कृतीतील गोष्टी ऐकवत त्यांना भविष्यात ग्लोबल सिटीझन होण्यास मदत होईल. शिवाय औपचारिक शिक्षणात देखील इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मग ठरवलं की मनोरंजनासह अनौपचारिकरित्या शिक्षण संस्कार देणारी पुस्तके व गोष्टी आपल्यासारख्या रसिकांसाठी इंटरनेट द्वारे ऑडियो माध्यमातून सादर करायची आणि म्हणून आपल्या समोर मांडत आहे ही 'बुकमाया '.

'बुकमाया' म्हणजे पुस्तकांत दडलेली धन संपत्ती आपल्या रसिकांसाठी श्रवणीय स्वरूपात सादर करीत आहोत . आणि आज श्रीगणेशा करताना शुभारंभाची कथा 'अग्रपूजा' .MP3 स्वरुपात आपल्यासाठी पोस्ट करताना खूप आनंद होत आहे. लवकरच अशा आणखी अनेक मजेदार कथा आणि पुस्तके आपल्या भेटीला येत आहेत. कारण आमचं ब्रीदवाक्य आहे : आम्ही वाचु आनंदे तुमच्यासाठी !
तर ऐकत रहा…  'बुकमाया '!!