Tuesday, November 5, 2013

शुभ दीपावली ! (Diwali Wishes!)



शुभ दीपावली !

बुकमाया परिवारातर्फे सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !


आज ख़ास भाऊबीजेच्या निमित्ताने आमच्या आईने रचलेली एक छानशी कविता तुमच्या साठी सादर करत आहोत .

आजच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाला भाऊबीजेनिमित्त घरी येण्याचे सप्रेम निमंत्रण देते. या कवितेतून बहीण आज एका थोर भावाला बोलावणे धाडत आहे . आता ऐका ही कविता … त्वमेव बंधू सखा त्वमेव

                    

त्वमेव बंधू सखा त्वमेव 


आग्रहाचे करीते मी निमंत्रण 
यावे हो भाऊबीज कारण 
आला आला हो दिवाळसण 
यावे ज्ञाना भाऊ सवे घेऊनी बंधुजन ।।

भक्तिभावे धाडीते मी सांगावा 
यावे हो तुम्ही माझिया गावा 
संगे आणावी माझी मुक्ताई 
महान देवी, ती प्रतीरूप आई ।।

तुम्ही माझेही थोर बंधुभगिनी 
भेट व्हावी या हो तुम्ही झणी 
ओवाळीन मी निरंजनी लोचन 
दर्शन तुमचे जणु अमृत प्राशन ।।

मना माझ्या मिळेल अपूर्व समाधान 
भूक शमेल तेव्हाच, घडता तुमचे दर्शन 
तृषार्त दर्शनार्थी अधीर माझे नेत्र 
भक्तीभावाच्या फुलांत गुंफीते गात्रन् गात्र ।।

तीर्थ प्राशुनी तुमच्या पदकमलांचे
होईल सार्थक माझ्या साता जन्मांचे 
द्या भेटीचे सुख पाहते वाटुली तुमची 
निवेल तहानभूक तळमळल्या जीवाची ।। 

‘पसायदान’ जे तुम्ही मागितले 
शतकांमागे विश्वात्मके देवाले 
मागीन फिरुनी, करीन आर्जवे 
मिळेल का ते आज, मागता तुम्हां सवे ।।


- सौ. मेधा श्रीश कामत 
भाऊबीज २०१३ 

No comments:

Post a Comment