Thursday, November 20, 2014

येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला


सुमारे ७९६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी  संजीवन समाधी घेतली होती. त्यांनी मूळ संस्कृत मधील वेदांचे, गीतेचे ज्ञान महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या भाषेत अनुवादित करून त्याचे त्यावेळच्या सोप्या मराठीत रोजच्या जीवनातील दाखले देत महाराष्ट्रातील सर्वसाधारण समाजापर्यंत पोहोचविले. देशात मुस्लिम राजवटीचा उदय होत असताना संस्कृत भाषेची धार्मिक पंडितांनी घातलेली बंधने ओलांडून मराठी प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ह्या क्रांतीकारी कवि-संत-समाजप्रबोधक 'माउली' ला बुकमाया परिवार सादर कोटी कोटी प्रणाम करीत आहे. 


येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला - भाग पहिला लेखन आणि निवेदन -अजिंक्य कामत

Thursday, October 2, 2014

विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! -बुकमाया परिवार

 विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! -बुकमाया परिवार

Friday, September 26, 2014

काय? तुम्हाला पण हवाहवासा वाटतोय ना लाईफ चा मेक ओवर?:)

गेल्या विकएंडला आम्ही बाहेर जेवायला होतो तेव्हा तिथे अचानक शीतल आणि सोहम जोशी भेटले. मग त्यांच्याशी छान गप्पा रंगल्या. कॉलेजपासूनच्या साऱ्या मित्र मैत्रिणींची खुशाली घेतली गेली. शीतल एका आय. टी. कंपनीत व्यवस्थापक पदावर तर सोहम एका आंतरराष्ट्रीय बँकेत व्यवस्थापक आहे.
गप्पा मारता मारता आमची गाडी नविन पुस्तकांवर येउन पोचली. एरवी 'कामातून डोकं वर काढून आयुष्य जगायला वेळच मिळत नाही गं ' असं  नेहमी खजील होऊन  सांगणारी ही दोघं परवा मात्र आवडलेल्या पुस्तकांबद्दल भरभरून बोलत होती.  शीतल अभ्यासापुरती तरी पुस्तकं वाचायची  पण सोहमला तर वाचनाचा आधीपासूनच कंटाळा. त्याच्या तोंडून "अगं इथे आल्यापासून गेल्या वर्षभरात १० पुस्तकं पूर्ण वाचून झालीत" हे उद्गार आणि स्टीव्ह जॉब्स चे चरित्र, द अल्केमिस्ट, शेरलॉक होम्स अशी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी ऐकून मी तर आश्चर्याने थक्कच झाले.
" हे कसं शक्य आहे ?" ह्या माझ्या प्रश्नावर माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून शीतलने लगेच उलगडा केला.
ती म्हणाली, " अगं वाचली म्हणजे खरं तर ऐकली. हल्ली आम्ही जॉगिंग करता करता, मेट्रो मधून प्रवास करता करता तर कधी घरी आल्यावर कामे आटपेपर्यंत ऑडीओ बुक्स ऐकत असतो. आपल्या सोयीने थोडा थोडा वेळ ऐकत अनेक पुस्तकं पूर्ण ऐकलीत. आता तर तो आमचा दोघांचा छंदच झाला आहे. पुस्तक ऐकत ऐकत प्रवासाचा वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. अनेकदा कामाच्या ओझ्याखाली थकलेलं मन आणि मेंदू एखादं हलकंफुलकं ऑडीओबुक ऐकून पुन्हा ताजे टवटवीत होतात. तेव्हा ईतकं बरं वाटतं म्हणून सांगू ….
मी तर धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करता करता सुद्धा पुस्तक ऐकत असते. टीव्ही वरच्या  त्याच त्याच ढंगाच्या मालिका तरी कोण कितीवेळ बघणार… त्यापेक्षा पुस्तक ऐकत ऐकत चार रुटीन कामं हातावेगळी करता येतात."
"कमालच आहे गं !" इति मी.
तशी शीतल आणखी उत्साहात सांगू लागली " अगं खरी कमाल तर माझ्या मुलीने, निशुने केलीय. आमची निशू आता ६ वर्षांची आहे. लहानपणापासून खूप बुजरी, शाय मुलगी. कोणाशी बोलायलाही घाबरायची. तिला नं रात्री झोपताना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. पण रोज गोष्ट सांगायला मला आणि तिच्या बाबाला कुठे वेळ असतो? तिचे आजी आजोबादेखील दूर असतात. म्हणून गेले ६ महिने रोज रात्री मी तिला झोपताना छोट्यांची ऑडीओ बुक्स ऐकवायला सुरुवात केली. आणि अगं तिला ती इतकी आवडू लागली की काय सांगू… आता माझी निशू चारचौघांशी बोलताना न लाजता न घाबरता अगदी छान बोलते. फारच चुणचुणीत झालीय गं ती आता. तिच्या मिस मला म्हणाल्या सुद्धा की 'तुम्ही तिला चांगल्या गोष्टी ऐकवता, छान ऑडीओ बुक्स ऐकवता त्यामुळे तिची भाषेवरची पकड छान झालीय. आणि आत्मविश्वासही वाढलाय. '


"थोडक्यात काय तर या ऑडीओबुक्स नी आमच्या लाईफचा मस्त मेक ओवर केलाय" सोहम म्हणाला.


काय? तुम्हाला पण हवाहवासा वाटतोय ना हा लाईफ चा मेक ओवर?

चला तर मग आम्ही तयार आहोत, bookmaya च्या स्वरुपात.

Thursday, September 25, 2014

Happy Navaratri !! शुभ नवरात्री !!


बुकमाया परिवारातर्फे नवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!! 

नमस्ते तु महामाये श्री पीठे सुरपूजिते । 
शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ।। 

Wednesday, September 17, 2014

बुकमायाच्या पहिल्या कथाकथन कार्यक्रमास रिचमंड, वर्जिनिया येथील रसिकांचा भरघोस प्रतिसाद

बुकमाया चे अजिंक्य कामत आणि सौ. यामिनी तेलंग रिचमंड, व्हर्जिनिया येथील मराठी मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात बालमित्रांसाठी कथाकथन सादर करताना


Friday, August 15, 2014

बुकमाया परिवारातर्फे आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


बुकमाया परिवारातर्फे आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Saturday, July 12, 2014

बुकमाया परिवारातर्फे आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

बुकमाया परिवारातर्फे आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

Sunday, May 11, 2014

Happy Mother's Day ! Hirakani chi Gosht (हिरकणीची गोष्ट)


आपल्या बाळासाठी प्राण पणाला लावणाऱ्या एका धाडसी आईची  गोष्ट : हिरकणीची गोष्ट

Thursday, May 1, 2014

बुकमाया परिवारातर्फे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो...जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र गीत 

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्न खड्ग करी उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

                     - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 

Monday, March 31, 2014

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी घरातील वडिलधारी व्यक्ति गुढी उभारते व इतर सर्वांसह मनोभावे वंदन करून आनंदोत्सव साजरा करते.
गुढीसाठी  वेळूची, बांबूची मोठी काठी धुवून स्वच्छ करतात. नंतर तिच्या एका टोकावर रेशमी वस्त्र घालून त्यावर चांदीचे / पितळेचे / तांब्याचे कलशाच्या आकाराचे भांडे पालथे घालतात. त्यावर कडूनिंब पाला , झेंडू, चाफा अशा फुलांच्या माळा व साखरेची माळ त्यावर बांधतात. ही गुढी अंगणात किंवा उंच जागी उभारतात.
शक्य नसल्यास खिडकीत लावतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. हल्ली घरातल्या घरात प्रतीकात्मक म्हणून छोटी गुढी ही उभारतात. एकमेकाला भेटवस्तू म्हणूनही अशी गुढी देतात. गुढीला बांधलेला कडूनिंबाचा पाला व साखरेची माळ जीवनातील कडूगोड प्रसंगांना हसत हसत सामोरे जाण्याची शिकवण देतात. ही शिकवण मनावर बिंबावी म्हणूनच काही भारतीय कुटुंबांत सकाळी कडूनिंबाची काही पाने खाण्याची पद्धत आहे. 
गुढीपाडवा हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आहेच. तसेच तो हिंदू पंचागातील साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी पहिला पूर्ण मुहूर्त असल्यामुळे हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. 

प्राचीन भारतीय पौराणिक परंपरेनुसार ब्रह्मदेवाने केलेल्या जगाच्या निर्मितीनंतर काल गणनेला याच दिवशी सुरुवात झाली. म्हणून गुढीला ब्रम्हध्वजा असेही म्हणतात. श्रीरामाला राज्याभिषेक करण्यात आला तो याच दिवशी. त्या आनंदात अयोध्येत सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याचे उत्तर रामायणात म्हटले आहे. 

ऐतिहासिक संदर्भानुसार, इसवी सनानंतर ७८ वर्षांनी,शालिवाहन (सातवाहन) राजाने भारतावर शक टोळ्यांनी केलेले आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले आणि शकांच्या पराभवाचे स्मरण राहावे म्हणून यादिवशी 'शालिवाहन शक' ह्या नवीन सनाचा प्रारंभ केला. 
तर असा हा गुढीपाडवा आणि येणारे नविन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुदृढ आरोग्यमय आणि  भरभराटीचे जावो हीच सदिच्छा !




Monday, March 24, 2014

श्रमाचे झाले सोने (Shramache Jhaale Sone)


आळशी शिवदास आणि अंबादासला त्यांच्या वडिलांनी शेतात लपवलेला सोन्याच्या मोहोरांचा हंडा कसा सापडतो ते ऐका ह्या कथेतून : श्रमाचे झाले सोने

It's a story of a farmer and his two sons. The farmer takes the help of a friend and teaches his lazy sons the importance of work and labor



(A story shared by my Father-in-law Mr. Sudhir Telang)

Saturday, March 8, 2014

आजच्या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने (सौ. आईचे मनोगत )

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा |
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ||


        नमस्ते! समस्त लहान-थोर भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

        अखिल पुरुषवर्ग तसेच नवरेवर्गातील समस्त जनतेला विनम्र अभिवादन. आपापल्या घरी माय-लेकी-पत्नी-सून-बहिण-वहिनी अशा अनेक रूपांत वावरणाऱ्या महिलाशक्तीला - आदिशक्तीला आपण मानाने वागवत असाल, त्याबद्दल धन्यवाद.

        पण अहो, जर त्यांचा मान ठेवत नसाल, त्यांचा नावलौकिक व्हावा म्हणून पाठींबा देत नसाल तर आता तरी ह्यापुढे - आजपासूनच द्या, अशी एक छोटीशी विनंती. कारण अनादिकालापासून, पुराणकालापासून महिलांना सन्मानाने वागविण्यात आले आहे. जसे आईवडिलांनी मुलामुलींना उच्च शिक्षण दिल्यावर मुलामुलींबरोबर त्याचे श्रेय आई-वडिलांना मिळते अगदी त्याप्रमाणेच पतीराजांनीही बायकांना विवाहानंतर जीवनात पुढे यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर पत्नीबरोबरच ते त्या नवऱ्यालाही गौरवास्पद ठरते. तसेच पुढच्या पिढ्यांनाही तुमचा आदर्श मिळतो. पटलं तर पहा.

आभारी आहे.

एक भारतीय महिला,
सौ. मेधा श्रीश कामत.

Monday, February 3, 2014

एकतेचे बळ (Ekateche Bal)


छोटे छोटे पक्षीदेखील एकत्र मिळून मोठी कामगिरी कशी करतात ते ऐका ह्या कथेतून : एकतेचे बळ


Sunday, January 26, 2014

भारतमाता की जय !

बुकमाया परिवारातर्फे सर्वाना भारतीय गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद !!!

Saturday, January 25, 2014

अस्वलाचा सल्ला (Aswalachaa Sallaa)


दोन मित्र रानटी अस्वलापासून स्वत:चा जीव वाचवितानाच खऱ्या मैत्रीचा अर्थ कसा शिकतात ते ऐका ह्या रानकथेतुन ... अस्वलाचा सल्ला


Tuesday, January 14, 2014

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !

स्नेह साखरी जगास देते तिळ -गुळाची जोड़ी 
मायेची ऊब देऊ- घेऊ, वाढो मनांतली गोडी 

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला 
बुकमाया परिवारातर्फे  सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Wednesday, January 1, 2014

Happy New Year !

Happy New Year !

बुकमाया परिवारातर्फे सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे वर्ष तुम्हाला सुखाचे आणि प्रगतीचे, भरभराटीचे जावो.