अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा |
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ||
नमस्ते! समस्त लहान-थोर भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
अखिल पुरुषवर्ग तसेच नवरेवर्गातील समस्त जनतेला विनम्र अभिवादन. आपापल्या घरी माय-लेकी-पत्नी-सून-बहिण-वहिनी अशा अनेक रूपांत वावरणाऱ्या महिलाशक्तीला - आदिशक्तीला आपण मानाने वागवत असाल, त्याबद्दल धन्यवाद.
पण अहो, जर त्यांचा मान ठेवत नसाल, त्यांचा नावलौकिक व्हावा म्हणून पाठींबा देत नसाल तर आता तरी ह्यापुढे - आजपासूनच द्या, अशी एक छोटीशी विनंती. कारण अनादिकालापासून, पुराणकालापासून महिलांना सन्मानाने वागविण्यात आले आहे. जसे आईवडिलांनी मुलामुलींना उच्च शिक्षण दिल्यावर मुलामुलींबरोबर त्याचे श्रेय आई-वडिलांना मिळते अगदी त्याप्रमाणेच पतीराजांनीही बायकांना विवाहानंतर जीवनात पुढे यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर पत्नीबरोबरच ते त्या नवऱ्यालाही गौरवास्पद ठरते. तसेच पुढच्या पिढ्यांनाही तुमचा आदर्श मिळतो. पटलं तर पहा.
आभारी आहे.
एक भारतीय महिला,
सौ. मेधा श्रीश कामत.
No comments:
Post a Comment