Tuesday, March 10, 2015

नमस्ते कुसुमाग्रजा!


कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

नमस्ते कुसुमाग्रजा!


नमस्ते कुसुमाग्रजा! सय ठेवूनी गेलात
गोड हिरव्या मखमली नि रेशीम बंधनात


किमया तुमच्या जादूभऱ्या शब्दांतुनी
जगता सजविले कुसुमे तुम्ही पसरुनी


हळूवार प्रेमभावना त्यातुनी स्रवती
आजही चिरतरुण मने हृदयस्पर्श अनुभवती


भवतीच्या ऋतुंची किमया रुजविली मनोमनी
त्या सामर्थ्ये आजही फुले गंधित फुलती जीवनी


निष्पर्ण रानी फुलविली कधी प्रेममाया
कधी जागविली वीरता ललकारुनी धैर्या


ऋषीतुल्य तुम्ही, गुरुस्थानी आम्हा
वारसा दिधला वंद्य तुम्ही आम्हा


द्या गोडवा वाणीचा नि लेखणी तेजाची
जन्मलो या भारती, सेवा करु मराठी मायबोलीची


द्या आशीर्वाद, कवीश्वर तुम्ही प्रतिभावंत
पूज्य तुम्ही, करतो मानाचा मुजरा आम्ही भाग्यवंत
  


- सौ. मेधा श्रीश कामत

Sunday, March 8, 2015

अनंतकाळची माता

(महिला दिनानिमित्त बुकमाया सादर करीत आहे ‘संस्कारदीप दिवाळी २०१४’ अंकामध्ये प्रसिद्ध झालेली ही कविता )




अनंतकाळची माता


हे शक्ति, हे नारी वंद्य तू विरांगना
किती म्हटले जरी तू ना अबला ललना


असे सत्य ऐकण्या कठिण, काही पुरुषांना
अवतीभवती, तुमच्या घरी पहाता त्या वावरताना


पुरुषाला जन्मही स्त्रीच देते
तुमची मर्दुमकी येथे फोल ठरते


कळा यातना भोग का तिला देता
ती नीच आम्हीच मोठे म्हणून मिरविता


पुरुषांनो, एवढे असाल जर स्वयंभू-बलशाली
तुम्हीच वाढवा तर पोटी तुमच्या वंशावळी


छळून पिडून घेता तिचा नाहक बळी
हीच म्हणे खूण पुरुषार्थाची आगळी वेगळी


अंश प्रसावूनी तू मानव घडविणे गोष्ट नाही खरी
नको बनूस दानव, जगती माननीय आहे नारी


खजील होई विधाता पाहूनी तुमचा ताठा
ज्याने दिला बहुमान स्त्रीला बनवूनी
                           अनंतकाळची माता


- सौ. मेधा श्रीश कामत