Friday, September 26, 2014

काय? तुम्हाला पण हवाहवासा वाटतोय ना लाईफ चा मेक ओवर?:)

गेल्या विकएंडला आम्ही बाहेर जेवायला होतो तेव्हा तिथे अचानक शीतल आणि सोहम जोशी भेटले. मग त्यांच्याशी छान गप्पा रंगल्या. कॉलेजपासूनच्या साऱ्या मित्र मैत्रिणींची खुशाली घेतली गेली. शीतल एका आय. टी. कंपनीत व्यवस्थापक पदावर तर सोहम एका आंतरराष्ट्रीय बँकेत व्यवस्थापक आहे.
गप्पा मारता मारता आमची गाडी नविन पुस्तकांवर येउन पोचली. एरवी 'कामातून डोकं वर काढून आयुष्य जगायला वेळच मिळत नाही गं ' असं  नेहमी खजील होऊन  सांगणारी ही दोघं परवा मात्र आवडलेल्या पुस्तकांबद्दल भरभरून बोलत होती.  शीतल अभ्यासापुरती तरी पुस्तकं वाचायची  पण सोहमला तर वाचनाचा आधीपासूनच कंटाळा. त्याच्या तोंडून "अगं इथे आल्यापासून गेल्या वर्षभरात १० पुस्तकं पूर्ण वाचून झालीत" हे उद्गार आणि स्टीव्ह जॉब्स चे चरित्र, द अल्केमिस्ट, शेरलॉक होम्स अशी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी ऐकून मी तर आश्चर्याने थक्कच झाले.
" हे कसं शक्य आहे ?" ह्या माझ्या प्रश्नावर माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून शीतलने लगेच उलगडा केला.
ती म्हणाली, " अगं वाचली म्हणजे खरं तर ऐकली. हल्ली आम्ही जॉगिंग करता करता, मेट्रो मधून प्रवास करता करता तर कधी घरी आल्यावर कामे आटपेपर्यंत ऑडीओ बुक्स ऐकत असतो. आपल्या सोयीने थोडा थोडा वेळ ऐकत अनेक पुस्तकं पूर्ण ऐकलीत. आता तर तो आमचा दोघांचा छंदच झाला आहे. पुस्तक ऐकत ऐकत प्रवासाचा वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. अनेकदा कामाच्या ओझ्याखाली थकलेलं मन आणि मेंदू एखादं हलकंफुलकं ऑडीओबुक ऐकून पुन्हा ताजे टवटवीत होतात. तेव्हा ईतकं बरं वाटतं म्हणून सांगू ….
मी तर धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करता करता सुद्धा पुस्तक ऐकत असते. टीव्ही वरच्या  त्याच त्याच ढंगाच्या मालिका तरी कोण कितीवेळ बघणार… त्यापेक्षा पुस्तक ऐकत ऐकत चार रुटीन कामं हातावेगळी करता येतात."
"कमालच आहे गं !" इति मी.
तशी शीतल आणखी उत्साहात सांगू लागली " अगं खरी कमाल तर माझ्या मुलीने, निशुने केलीय. आमची निशू आता ६ वर्षांची आहे. लहानपणापासून खूप बुजरी, शाय मुलगी. कोणाशी बोलायलाही घाबरायची. तिला नं रात्री झोपताना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. पण रोज गोष्ट सांगायला मला आणि तिच्या बाबाला कुठे वेळ असतो? तिचे आजी आजोबादेखील दूर असतात. म्हणून गेले ६ महिने रोज रात्री मी तिला झोपताना छोट्यांची ऑडीओ बुक्स ऐकवायला सुरुवात केली. आणि अगं तिला ती इतकी आवडू लागली की काय सांगू… आता माझी निशू चारचौघांशी बोलताना न लाजता न घाबरता अगदी छान बोलते. फारच चुणचुणीत झालीय गं ती आता. तिच्या मिस मला म्हणाल्या सुद्धा की 'तुम्ही तिला चांगल्या गोष्टी ऐकवता, छान ऑडीओ बुक्स ऐकवता त्यामुळे तिची भाषेवरची पकड छान झालीय. आणि आत्मविश्वासही वाढलाय. '


"थोडक्यात काय तर या ऑडीओबुक्स नी आमच्या लाईफचा मस्त मेक ओवर केलाय" सोहम म्हणाला.


काय? तुम्हाला पण हवाहवासा वाटतोय ना हा लाईफ चा मेक ओवर?

चला तर मग आम्ही तयार आहोत, bookmaya च्या स्वरुपात.

1 comment:

  1. काय? तुम्हाला पण हवाहवासा वाटतोय ना लाईफ चा मेक ओवर?:)

    ReplyDelete