Wednesday, April 1, 2020

दे कोकिळे आम्हा नवचैतन्य


दे कोकिळे आम्हा नवचैतन्य

ऐकिली साद तुझी गोड कुहुक
अवतरलीस सखे वसंत सन्मुख

नितवर्षी आपण गळ्यात घालूनी गळे
भेटलो बागेत तू नि मी मंजुळे

परि साद मी ऐकूनी तुझी कानी
ना धावत आले आज अंगणी

दशदिशा कापती भये मृत्युचे थैमान
जगती वेगे आज महामारीचा फैलाव

देवदूत तू आळव हो प्रभूसी
मिळो वरदान निरामय जीवन आम्हासी

आप्तेष्ट-स्वजनांसंगे ऐकू हो गीत तुझे
लाभो आम्हा भाग्य नाते चैत्रपालवीचे

नववर्ष आगमने होऊनी प्रफुल्लीत
उभारू गुढी घरी-दारी सजवू आरास फुले रंगीत

दे कोकिळे दे आम्हा नवचैतन्य
दशदिशा उजळो तेजे जन्म सफल धन्य

  • सौ. मेधा श्रीश कामत 


                    


No comments:

Post a Comment