बुकमाया परिवारातर्फे सर्व भारतीय युवा मित्रमंडळींना जागतिक युवा कौशल्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
घ्या ध्यास
लाभले चैतन्यमयी हे यौवन जीवनी
युवकानो सारे या रे पुढे सरसावूनी!
नाही जरी गुरुजी, नाही शिक्षक
नाही अभ्यासिका, शिबीर, वर्ग
किडे मकोडे माशी अवतीभवती विहंग
बांधिती घरटी कौशल्ये घांदल लगबग!
नाही लाभली दहा बोटे, दोन हात
परि कौशल्य लाविती पणास तेही बुद्धिवंत
गळा दिधला देवाजीने अमृतवाणी
युवकानो विलसे करी माय सरस्वती
तुम्ही शिल्पकार जीवनाचे घडविता देवाजीला
दान दिले भरभरुनी बुद्धीकौशल्य ज्याने तुम्हाला!
फडकेल ध्वज विजयाचा तुमच्या त्रिखंडात
ज्ञानसंस्कारे दिग्गजांच्या, तुमचा होईल जयजयकार!
यशोशिखराच्या दिव्यांची अहा आरास
खुणाविते पहा करी लुकलुक, घ्या ध्यास!
सौ. मेधा श्रीश कामत
Poetry is vibrant and joyfull
ReplyDeleteशांत आणि वीर रसाचा आविष्कार
ReplyDeleteशांत आणि वीर रसाचा आविष्कार
ReplyDeleteKhoop chan kavita...
ReplyDeleteशब्दांचा योग्यपणे वापर आणि विशिष्ट क्षणांना अचूक टिपले आहे. मनापासून आवडली
ReplyDeleteअप्रतिम शब्द बांधणी
ReplyDelete