शेला पांघरूनी केशरी फुलांचा पळस वृक्ष ||
गरम हवा उष्ण झळा सोसवेना,
फेरा ऋतुचक्राचा उन्हाळा साहवेना ||
मन होता निरस विषण्ण उदास,
उन्हामाजी उभा पळस प्रफुल्लीत करी त्यास ||
केशरी उधळण अहा फुलांची आरास,
पाहता पळस असा पळे हो आळस ||
उत्सव होळीचा रंगपंचम करीतसे दंग,
केशरी कुसुमांचा पळसाच्या, बनविता रंग ||
झळाळी पाहता ही आनंदती लोचन,
हरखूनी नाचे मन होऊनी उन्मन ||
देवाजीची किमया सारी सोनसळा तेजोमय,
दिव्यत्व वातावरणी उजळे ज्योतिर्मय ||
- सौ. मेधा श्रीश कामत

मेधा,
ReplyDeleteअर्थगर्भ प्रतिभेचा आविष्कार आहे तुझ्या काव्यात.
शुभेच्छा 💐